Tuesday 3 January 2012

काही माई बद्दल


 


सिंधुताई सपकाळ ....म्हणजेच ..माई....वयवर्षे ६५, पहिल्या पासून ..काही तरी करण्याची जिद्द ..लग्न नंतर हि त्यांनी गावातल्या महिलां साठी त्यांच्या हक्क साठी लढा केला ...पण त्याचा मोबदला म्हणजे त्यांना त्यांच्या नवर्याने व सासर कड्च्यांनी घर बाहेर काढले लहान मुली सोबत ...पण २१ वर्ष च्या माईनि धीर सोडला नाही .. पूर्वी चे दिवस फार कठीण गेले ...पुणे च्या रेल्वे स्थानकावर भिक मागून गेले ... पण जे काही मिळायचे ते पण स्वतःकडे न राखून बाकीचे जे भिकारी आहेत त्यांना वाटायचे ...खास करून लहान मुलांना ...

त्यांचा एका मुलाखतीत त्या म्हणाल्या.." मला जेव्हा घर बाहेर काढले तेव्हा जगण्या साठी मी भिक मागायचे, पण आज पण मी कटोरा घेऊन सगळी भिक मागत असते, फरक फक्त एवढाच आहे कि, पूर्वी स्वतः साठी भिक मागायचे आणि आता माझी मुलांसाठी". पुढे जेव्हा त्यांना आपल्या पूर्वी च्या आयुष्य बद्दल विचारले असता त्या म्हणाले कि "मी माझ्या पतीचे खूप आभार मानते कि जर त्यांनी मला घर बाहेर नाही काढले असते तर आज मी या ठिकाणी येऊन पोहोचली नसती... ते सुद्धा माझ्या आश्रमात राहतात ....खूप थकले आहेत आता ..त्यांना बघणारे कोण नव्हते म्हणून मीच त्यांना इथे आणले.. पण त्यांना आणताना मी स्पष्ट सांगितले कि इकडे यायचे असेल तर माझा मुलगा म्हणून या .. पती म्हणून नव्हे..." हे ऐकून मुलखात घेणारे.. थक्क झाले...आणि ती मुलखात बघणारे सुद्धा...!!!!!अर्ध्याहून जास्त आयुष्य अनाथ मुलां साठी घालवले त्याच माई...

'मी सिंधुताई सपकाळ' चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर

अनाथ, उपेक्षित मुलांच्या आयुष्यात पहाट निर्माण करणाऱ्या समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यावर आधारित 'मी सिंधुताई सपकाळ' या मराठी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवली आहे. 'लंडन फिल्म फेस्टिव्हल'सह न्यूयॉर्कमधील 'साऊथ एशियन इंटरनॅशनल फेस्टिव्हल'मध्ये या चित्रपटाची निवड झाली आहे. या निवडीने समस्त मराठी कला, कलावंतांची मान जगभरात उंचावली आहे.

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या दोन्ही फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाची निवड होणे ही कौतुकाची बाब मानली जात आहे. लंडन फिल्म फेस्टिव्हलला १३ ते १५ ऑक्टोबरपर्यंत तर, साऊथ एशियन इंटरनॅशनल फेस्टिव्हल २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. जगातील अनेक नामवंत चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. अनंत महादेवन दिग्दशिर्त चित्रपटात तेजस्विनी पंडित, उपेंद लिमये, ज्योती चांदेकर यांनी प्रमुख भूमिका बजावल्या आहेत.